शेतात वीज पडून ४ जण जखमी , वाघोली येथील घटना


- 'वेळ आली होती पण काळ नाही'  : मोठी दुर्घटना टळली  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
तालुक्यातील वाघोली शेत शिवारात ३ वाजताच्या दरम्यान मेघगर्जना सुरु झाली.  त्यात गजभे यांच्या शेतात वीज पडली व त्यात शेतात काम करणारे चार व्यक्ती जखमी झाले.  त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर  आहे .
वाघोली येथील हरिदास चंपत गजभे (५२) यांच्या शेतात शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान वीज पडली . त्याचा धक्का एवढा मोठा कि त्यात शेतात काम करणारे चार व्यक्ती जखमी झाले दिलीप चिंतामण  जिवतोडे(३०)  , प्रमोद हरिदास गजभे (२५), हरिदास चंपत गजभे (५२), रोशन हरिदास गायकवाड (२५) सर्व राहणार वाघोली अशी  जखमींची  नावे असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरु आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2017-09-09
Related Photos