झुडूपांनी वेढलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा जिव धोक्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी/ आष्टी श.:
तालुक्यातील दलपतपूर मार्गावर दोन्ही बाजूंनी  मोठ्या प्रमाणात हिरवी झुडूपे तयार झाल्याने अर्धा रस्ता झुडूपांनी व्यापला आहे. यामुळे नागरिकांना आवागमन करतांना जीव धोक्यात घालवा लागत आहे. याकडे मात्र सबंधित विभागाने दूर्लक्ष केले आहे.
दलपपूर येथील नागरिकांना तळेगाव - नागपूर महामार्गावर जाण्यासाठी हा एकमेवर रस्ता आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. मात्र झुडूपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. या मार्गाने दलपतपूर येथील विद्यार्थी आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. काही विद्यार्थ्यांनी  शिकवणी लावली असल्यामुळे त्यांना घरी परतण्यास उशिर होतो. रात्रीच्या वेळी विद्यार्थी मनात भिती बाळगून या शिकवणी अर्ध्यातच  सोडून घरी परतावे लागते. नवख्या प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करतांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. कारण समोर नेमके काय आहे, याची कुठलीही माहिती या प्रवाशांना नसते. रस्त्यावरील झुडूपे तोडण्याबाबत अनेकदा शासनाकडे निवेदने देण्यात आली. याला एक वर्षांचा कालावधी लोटला. मात्र झुडूपे कापण्यातच आली नाही. यामुळे आणखी झुडूपे वाढतच असून  पावसामुळे झुडूपे हिरवीगार आणि गर्द झाली आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे अभियंते झोपेत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येत्या पाच दिवसात कोणतीही कार्यवाही न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2017-09-02
Related Photos