अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयातून जनतेच्या तक्रारी सोडवाव्यात: योगिता पिपरे


- विज वितरणचा ग्राहक मेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विद्युत विभागाच्या अधिकारी आणिक कर्मचाऱ्यांनी समन्वयातून ग्राहक आणि जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. सध्याच्या काळात प्रत्येकालाच वीज सेवेची गरज आहे. त्यामुळे जनतेला नियमित व अखंडीत वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग गडचिरोलीच्या वतीने स्थानिक पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालनात आज विद्युत ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्षा पिपरे बोलत होत्या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, विद्युत विभागाचे अभियंता म्हस्के, कार्यकारी अभियंता म्हस्के, कार्यकारी अभियंता मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले, विद्युत ग्राहक व जनतेच्या तक्रारींचे निराकरण वेळेत करून त्यांचे समाधान करावे. मीटरमधील रिडींग योग्य रित्या घेवून वाजवी बिल पाठवावे. तसेच डिमांड भरलेल्या ग्राहकांना तत्काळ विजपुरवठा देण्यात यावा. कार्यकारी अभियंता मेश्राम म्हणाले, विद्युत विभाग ही वित्तीय संस्था नसून जनहिताची आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवाकरण करून समाधान करणे हे या विभागाचे काम आहे. ग्राहकांनी नियमित विज देयके भरून सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. 
कर्यक्रमाचे संचालन कनिष्ठ अभियंता जोशी यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य जगन्नाथ पा. बोरकुटे, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, महिला व बालकल्याण सभापती अलका पोहनकर, शिक्षण सभापती अॅड. नितीन उंदिरवाडे, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, पोटे, कोल्हटवार, नगरसेवक संजय मेश्राम, सतीश विधाते, पुजा बोबाटे, रितु कोलते, लता लाटकर, देवाजी लाटकर व नागरिक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-09-01
Related Photos