चोप तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यातील प्रेमीयुगल अडकले विवाहबंधनात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
चोप येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यातील प्रेमवीरांना लग्नाच्या बेडीत बांधून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्याचे कार्य केले.  राकेश हेमराज वालदे असे प्रेमवीराचे  तर शुभांगी रमेश नागोसे असे प्रेयसीचे नाव आहे. दोघेही  खोलमार ता लाखांदूर जी भंडारा येथील असून   आंतरजातीय आहेत. 
मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेम बहरले होते. या प्रेमीयुगुलांची माहिती आई-वडिलांना झाल्याने त्यांनी त्यांच्या विवाहास नकार दिला. त्या दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करला. परंतु एकमेकांपासून अलग राहणार नाही, अशी प्रतीज्ञा केल्याने अखेर आई-वडिलांचे प्रयत्न निष्फळ ठरले. लोकांच्या नजरेआड असे किती दिवस काढायचे, याचा सारासार विचार करून अखेर त्या प्रेमीयुगुलाने  चोप गावातील तंटामुक्त समितीकडे आपली कैफीयत मांडून लग्न लावून देण्याची विनंती केली.   प्रेमीयुगुलांचा आलेला अर्ज पाहून  चोप तंमुसने त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची खात्री झाल्याने बुद्ध  विवाह पध्दतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला.   यावेळी गावातील नागरिकांच्या उपस्थितीत तथा आशीर्वादाने  पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्यात आले. विवाहाप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक बनपुरकर,  मुंडले , उपसरपंच कमलेश बारस्कर,   कैलास कुथे,  गरीबदास बातबर्वे,  मोरेश्वर मुंडले,  अशोक मेश्राम,  कचरू सहारे,  दादाजी सहारे,  वाल्मिक वालदे,  मुखरू कुथे , अरविंद कुथे तसेच गावातील महिला-पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते. विशेषता मागच्या आठवड्यात एका प्रेमीयुगलाचे  लग्न चोप त मु स ने लावला होता.   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-08-29
Related Photos