'रक्त घ्या , न्याय द्या' : साई वर्धा पॉवर कंपनीत कामगारांचे अनोखे आंदोलन


- रक्तदान  करून केली कामाची मागणी 
- ९० कामगारांनी केले रक्तदान  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  वरोरा :
साई वर्धा पॉवर कंपनीतील १५० कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने  कामगारांनी गेल्या दीड महिन्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे   न्यायासाठी येरझाऱ्या घालूनही तोडघा निघाला नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत ``रक्त घ्या अन  न्याय द्या`` म्हणत रक्तदान करून  कंपनी प्रशासनाचा  निषेध केला.
 शहराजवळील मोहबाळा गावा लगत असणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी गेल्या आठ वर्षा पासून कोळश्यापासून वीज निर्मितीचे काम करीत आहे.   सदर कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर  कामगार कार्यरत असून कंपनीत अनेक सह कंपन्या कार्यरत आहेत.  यातील चेन्नई राधा या कंपनीचे  कंत्राट संपुष्ठात आल्यामुळे ३० जून २०१७ पासून इन्फोटेक नावाची कंपनी त्या कंपनीच्या ठिकाणी काम करणार असून त्यासाठी सर्वच कंत्राटी कामगारांच्या  कंपनीच्या माध्यमातून मुलाखती घेऊन कामगारांना कामावर घेण्यात येईल अशी नोटीस कंपनीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. त्याप्रमाणे  कंपनीने कामगारांच्या हुद्द्या प्रमाणे १५ व १६ जुलैला  मुलाखती ठेवण्यात आल्या . पण कुठलीही मुलाखत न घेता २१ जुलै पासून कामगारांना प्रवेश बंद करण्यात आल्याने  संतप्त कामगारांनी  जिल्हाधिकारी  व सहाय्यक कामगार  आयुक्त यांचेकडे  सर्व कामगारांना होते त्या हुद्द्यावर पूर्ववत कामावर घेण्यासाठी निवेदन दिले. त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारवाई सुरु केली खरी चारदा कंपनी व्यवस्थापन व कामगारांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नच केला.  मात्र कंपनी व्यवस्थापनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे व त्यांनी हे कामगार आमचे नाही असे  म्हटल्यामुळे समेट घडून आला नाही व कंपंनी प्रशासनाने  कुठलीही पूर्व सूचना न देता कामगारांना कामावरून कमी केले.  हे कृत्य बेकायदेशीर असून कामगारांनी न्यायालयात न्याय मागावा असा सल्ला सहायक कामगार आयुक्त यांनी दिल्यामुळे सर्व प्रसकीय पर्याय वापरूनही न्याय न मिळाल्याने कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपली व्यथा कथन करताच कंपनीने केलेले कृत्य हे बेकायदेशीर असून यात काही प्रकल्पग्रस्तही आहेत.  त्यांनाही कामावरून कमी करणे हे कंपनीचे अडेलतट्टू धोरण खपवून घेणार नसून कमानी प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही  दिला होता.  मात्र   प्रशासन मानत नसून गेल्या दीड महिन्यापासून रोजगारापासून वंचित असणाऱ्या कामगारांनी  संघटित होऊन आ बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात व प्रहार कामगार संघटना महासचिव बाळकृष्ण जुवार , प्रहार तालुका अध्यक्ष अमोल डुकरे यांच्या नेतृत्वात २८ आगस्ट पासून रक्तदान करून आंदोलनाला सुरवात केली . कामगारांकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ९० कामगारांनी रक्तदान केले असून आमचे रक्त देऊनही  कंपनी प्रशासनाला जाग न आल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा बाळकृष्ण जुवार यांनी दिला आहे .
रक्तदान शिबिरात जिल्हा सामान्यरुग्णालयाची चमू    प्रहार सेवक गणेश उराडे , सुरज घुमे   नितीन नागरकर, समीर पाटील ,गोविंदा खडसे, राम घोगरे, किरण जोगी, प्रशांत भोयर, अशोक चिकटे, संतोष बुटले, विवेक लभाने सुशील पिंपळकर, अशोक चिकटे ,व इतर कामगार व प्रहार कार्यकर्ते  उपस्थित होते .

भर पावसात केले कामगारांनी रक्तदान 
सकाळी १० वाजता सुरु होणारे हे आंदोलन कमानी प्रशनांच्या दबावामुळे दोन तास उशिरा सुरु झाले मात्र ५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर पाऊस पडायला सुरवात झाली मात्र कशाची हि तमा न बाळगता ५० कामगारांनी भर पावसात रक्तदान केले  व पाऊस जास्त लागल्यामुळे मग इतर ४० कामगारांनी मोहबाळा  येथील समाज भवनात रक्तदान केले .

सहायक कामगार आयुक्त यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न  केला पण कंपंनी प्रशासन मानले नाही. या प्रकरणात जिल्हा प्रशासन समेट घडवून आणणार असल्याची जिल्हाधिकारी यांनी सांगितले असून आज झालेले आंदोलनं हे शांततेत होते . कंपनी  प्रशासन मानले नाही तर प्रहार स्टाईल ने आंदोलन करू अशी प्रतिक्रिया प्रहार कामगार संघटना महासचिव बाळकृष्ण  जुवार यांनी दिली.   Print


News - Chandrapur | Posted : 2017-08-28
Related Photos