कर्जमाफीसाठी आतापर्यंत ३२ लाख ८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी


 - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती 
- २६ लाख ७२ हजार ८५७ ऑनलाईन अर्ज प्राप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू असून आज दि.२६ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत ३२ लाख ८ हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली. त्यात २६ लाख ७२ हजार ८५७ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
श्री.देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यामध्ये ऑनलाईन भरण्यात येत आहेत. आपले सरकार केंद्र, नागरी सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील केंद्रांचा समावेश आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत दि.१५ सप्टेंबर २०१७ असून या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.



  Print






News - Rajy | Posted : 2017-08-27




Related Photos