पोलिसांनी केला सिरकोंडा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी सुरळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील  सिरकोंडा-झिंगानूर मार्गावरील सिरकोंडा नाल्यावरील पूल पावसामुळे वाहून गेला  होता. यामुळे परिसरातील नागरिकांचे आवागमन बंद पडले होते. या बाबीची दखल घेत  सिरोंचाचे  उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. 
  सिरकोंडा-झिंगानूर रोडवरील सिरकोंडा नाल्यावरील पूल पावसामुळे वाहून गेल्यामुळे सिरकोंडा -झिंगानूर मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील जवळपास सर्व गावांचा संपर्क तुटला होता. या मार्गावरील पुर्ण वाहतूक बंद झाल्यामुळे या भागातील सरकारी कर्मचारी व नागरीकांची गैरसोय झाली होती. ही गैरसोय दुर करण्याकरीता उपपोस्टे झिंगानूर व झिंगानूर क्युआरटीचे पोउपनि गायकवाड, पोउपनि बंडगर व क्यु.आर.टी सिरोंचा चे पोउपनि निलेश चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस जवान तसेच गावकरी यांनी मिळून सदरचा वाहून गेलेला पूल परत तयार केला आहे. त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-08-24
Related Photos