केळझर येथील महिलांनी केले अवैद्य दारूविक्रेत्यांचे ऑपेरेशन, १९ दारूविक्रेत्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर :
 केळझर येथील महिलांनी अवैद्य दारूविक्रेत्यांविरुद्ध एल्गार पुकारला असून   मागील पांच दिवसापासून  धाडसत्र मोहीम हाती घेउन तंटामुक्ती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी १९ दारू विक्रेत्यांच्या शेतातील आणि घरून  दारु बनविण्याच्या साहित्यासह मुल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. महिला शेतीचे काम आणि मजुरी बडवून दारूविक्रेत्यांचे ऑपेरेशन करीत आहेत. 
 चंद्रपुर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून   दारूबंदी  करण्यात आली. मात्र  जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे  अवैध दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.  मागील काही महिन्याआधी भद्रावती पोलिस स्टेशनचे काही पोलिस कर्मचारी अवैध दारू विक्रेत्याकडून पकडलेली दारू परस्पर काढताना सापडले  होते . चंद्रपुर शहर पोलिस  स्टेशन, दुर्गापुर पोलिस स्टेशन , बल्लारपुर पोलिस स्टेशन यासारखे असंख्य पोलिस स्टेशन अंतर्गत काही पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यातसुद्धा अडकले आहेत. या अवैध दारूविक्रेत्यांवर  पोलिस नाममात्र कार्यवाही करीत असून   पोलिस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी स्वतःचा  फायदा करून घेताना दिसत असल्याचे महिलांनी म्हटले आहे. 
 बैल पोळा  म्हणजेच शेतकऱ्यांचा व  लहान मुलांचा  आनंदी सण आणि मोठ्या मंडळींचीसुद्धा लहान पणाची आठवण येणारा तो दिवस. मात्र  काही लोकांना दारू पिने आणि जुगार खेळणे  यामध्ये आनंद येत असते.  हा प्रकार खेड्या पाड्यात पाहायला  मिळतो . कारण काही भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेता   दारूच्या हातभट्या लावून मोहाची  दारू बनवून अवैध रित्या विक्री करतात .
एकट्या चंद्रपुर जिल्ह्यातच हा प्रकार नसून चंद्रपुर जिल्ह्याला  लागुन असलेल्या वर्धा  व गडचिरोली जिल्ह्यातही याच प्रकारे अवैद्य दारूविक्री सुरु आहे.   या तिनही जिल्ह्यातील  प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे .

 मुल तालुक्यातील केळझर गावातील महिला तंटामुक्त समितीच्या  वतीने गेल्या पांच दिवसापासून पोळा सणाच्या तोंडावर   गावातील महिला आपल्या शेतातील कामांची रोजी बुडवून अवैध दारू विक्रेत्यांच्या घराची झडती घेऊन दारू बनविण्याचे साहित्य आणि शेतातील पुरून ठेवलेली मोहफुलाची मटकी नष्ट केली आहे.    अवैध दारू विक्रेत्यांवर  पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली  असून पोलिस प्रशासन या तंटामुक्ती समितीच्या  महिलांना सहकार्य का करत नाही याकडे अनेकांचा लक्ष्य लागले आहे.  पोलिस अधीक्षक नियती ठाकर   याकडे   लक्ष दिले पाहिजे. 
  निर्मला चुनारकर ( तंटामुक्त अध्यक्ष केळझर )    Print


News - Chandrapur | Posted : 2017-08-20
Related Photos