एसडीपीओंच्या पथकाने दारू तस्करांकडून जप्त केला १ कोटी ५ हजारांचा मुद्देमाल


- मामला जंगल परिसरातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी/ चंद्रपूर:
स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या पथकाने अवैधरित्या दारूतस्करांवर मोठी कारवाई केली असून १  कोटी ५  हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे दारूविक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकास चंद्रपूर येथील मामला जंगल परिसरामध्ये ट्रकमधून दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिस पथकाने मामला जंगलात सापळा रचून ट्रक क्रमांक एनएल २ एन ५८  ला पकडले. चालक राजकुमार साधुराम शर्मा रा. सुगतनगर नागपूर याला ताब्यात घेवून ट्रकची झडती घेतली. ट्रक मध्ये विदेशी दारूने भरलेल्या ५०० पेट्या आढळून आल्या. यामध्ये तब्बल २४ हजार बाॅटला असून दारूची किंमत ७५  लाख इतकी आहे. ट्रक ची किंमत २५ लाख रुपये असून आरोची पाच हजार रूपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नियती ठाकेर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विलास सत्यवान गेडाम, नापोशि मिलींद चव्हाण, विनोद यादव, पोलिस शिपाई जमिर खान, आनंद खरात, पंकज शिंदे, अंकुश मांदाळे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-08-09
Related Photos